शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द) येथे स्थापत्य अभियांत्रिकी विभाग व अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी यांच्या सयुंक्त विद्यमाने कौशल्य विकास अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन दि. २१ सप्टेंबर २०१८ रोजी करण्यात आले होते. सदर कार्यशाळेचा विषय “बेस्ट कॉंक्रीटिंग प्राक्टीसेस” असा होता. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ अविनाश पंत (मा प्राचार्य, शा अ व सं म अवसरी), यांचे हस्ते झाले. या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून श्री. महेश कोळी (सहाय्यक व्यवस्थापक) व श्री झहीर मोहम्मद (टेरीटोरी सेल एक्झेकेटीव), अल्ट्राटेक सिमेंट कंपनी लि , पुणे शाखा यांचे प्रतिनिधी आले होते. स्थापत्य विभागाचे विभागप्रमुख व कार्यशाळेचे समन्वयक डॉ. वासुदेव देऊळकर, यांनी प्रमुख पाहुण्यांना व श्रोत्यांना विभागाअंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.
मार्गदर्शन पार भाषणात मा. प्राचार्य यांनी बेस्ट कॉंक्रीटिंग प्राक्टीसेस ही काळाची गरज नमूद करून त्याकरिता अद्यावत व आधुनिक संसाधने असलेली सिमेंट-कॉंक्रीट ची प्रयोगशाळा अवसरी सारख्या ग्रामीण भागात असावी अशी अपेक्षा प्रकट केली. श्री. महेश कोळी (सहाय्यक व्यवस्थापक) व श्री झहीर मोहम्मद (टेरीटोरी सेल एक्झेकेटीव) यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास उपक्रमां अंतर्गत “बेस्ट कॉंक्रीटिंग प्राक्टीसेस” या विषयावर व्याख्याने दिले. व्याखानादर्म्यान श्रोत्यांना खालील माहिती देण्यात आली.
• टिकाऊ व मजबूत कॉंक्रीटिंग साठी लागणारे आवश्यक घटक • कॉंक्रीटिंग करतानाची प्रक्रिया, कॉंक्रीट मध्ये केमिकल चा उपयोग, • योग्य फोरम वर्क ची निवड, व साईट वार घ्यावयाच्या काळज्या व • कार्यशाळेच्या शेवटी बेस्ट कॉंक्रीटिंग चे प्रात्याक्षिके दाखविण्यात आले .
या कार्यशाळेत स्थापत्य कॉनट्रक्टर व अंतिम वर्षाचे विद्यार्थी व अध्यापक असे एकूण १०० श्रोते हजर होते. कार्यशाळेची सांगता प्रमाणपत्रे वाटून करण्यात आली. यावेळी स्थापत्य विभागाचे विभागप्रमुख तथा कार्यशाळेचे समन्वयक डॉ. वासुदेव देऊळकर, प्रा. (डॉ ) स्वप्नील खरमाळे, अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी लि चे प्रतिनिधी, श्री. महेश कोळी व श्री झहीर मोहम्मद उपस्थितीत होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री स्वप्नील लोणकर (विद्यार्थी, तृतीय वर्ष) यांनी केले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: